पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन

21 Jul 2020 12:36:33

yashomati thakur_1 &
 
अमरावती : काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजस्थान सरकारच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करताना ‘शेणातले किडे’ असा वादग्रस्त उल्लेख केला. त्यामुळे मंगळवारी अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपा महिला आघाडी तर्फे यशोमती ठाकूर यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी जोरदार निदर्शने करत संतप्त महिलांनी यशोमती ठाकूर यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली.
 
 
 
कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राजस्थानमधील राजकीय वातावरणामध्ये ‘शेणातल्या किड्याप्रमाने भाजपा वळवळ करत आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर यशोमती ठाकूर या विनाकारण भाजपला लक्ष करत असल्याचे आरोप भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0