धाडसी कंगनाला कायद्याचे पाठबळ देणार सुब्रमण्यम स्वामी!

    दिनांक  20-Jul-2020 16:52:29
|
kangana_1  H x


कंगना बॉलीवूडमधील सर्वात धाडसी अभिनेत्री : सुब्रमण्यम स्वामी


मुंबई : बॉलीवूडमधील घराणेशाहीचा बळी ठरलेल्या सुशांतच्या बाजूने आवाज उठवणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतला भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी कायदेशीर मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, कंगना राणावत ही बॉलीवूडमधील अतिशय धाडसी अभिनेत्री आहे. त्यांनी इश्करन भंडारी यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. ते कंगनाला कायदेशीर मदत देतील.


यासंदर्भात कंगनाला कायदेशीर मदत दिली जाण्यावर चर्चा करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी लवकरच इश्करन यांच्याशी भेट घेणार आहेत. सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कंगनाची चौकशी केली जाणार आहे. यात कंगनाची कायदेबाजू सुब्रमण्यम स्वामींचे वकील इश्करन भंडारी सांभाळणार आहेत.


इश्करन भंडारी यांनीही याची पुष्टी केली आहे. सुब्रमण्यम स्वामींचे वकील म्हणून ते काम पाहतात. भंडारी म्हणाले की, ‘स्वामींनी अगोदरच सांगितले आहे की, मुंबई पोलिसांना निवेदन देण्याच्या संदर्भात कंगनाला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत हवी असेल तर ते त्यासाठी तयार आहेत.’


त्यांनीच मुंबई पोलिसांना पत्र पाठविले होते आणि सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याचा फ्लॅट पूर्णपणे सील ठेवण्याची मागणी केली होती. इश्करन म्हणाले की, कंगना राणावत ही धैर्यवान अभिनेत्री आहे. अर्णब गोस्वामी यांच्याशी बोलताना कंगनाने दिलेल्या वक्तव्याचे समर्थन करत सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. आतापर्यंत कंगनाने कायदेशीर बाबींबाबत कोणतेही विधान केलेले नाही.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.