'सुशांत सिंह राजपूत'ची डेथ मिस्ट्री लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर!

    दिनांक  20-Jul-2020 16:32:18
|

sushant_1  H x


सुशांतसारखा दिसणारा टिकटॉक स्टार सचिन तिवारी साकारणार प्रमुख भूमिका

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला दीड महिना उलटून गेला आहे. पोस्टमॉर्टम व व्हिसेरा अहवालाच्या आधारे पोलिस आत्महत्या म्हणून प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र सुशांतचे चाहते, कुटुंबातील सदस्य, काही सहकारी आणि काही राजकारणी याला हत्या असल्याचे सांगत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. एकीकडे सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडावे म्हणून प्रयत्न केले जात आहेत. तर, दुसरीकडे फिल्म इंडस्ट्रीत याच पार्श्वभूमीवर एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, त्यात सुशांतसारखा हुबेहुब दिसणारा आणि टिकटॉकर सचिन तिवारी सुशांतशी प्रेरित असलेल्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


'सुसाइड ऑर मर्डर’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, त्याचे दिग्दर्शन शमिक मौलिककरत आहेत. यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी ओटीटी प्लॅटफॉर्म व्हीएसजी बिंजवर हा चित्रपट रिलीज केला जाऊ शकतो. या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हीएसजीच्या सोशल मीडिया पेजवरुनही शेअर केला गेला आहे, ज्यात सचिन तिवारीला बॉलिवूडमधील आउटसाइडरच्या रुपात दाखवले गेले आहे.

पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "छोट्या गावातून आलेला एक मुलगा चित्रपटसृष्टीत एक चमकणारा तारा बनतो. ही त्याची कहाणी आहे. एका आउटसाइडरच्या रुपात सचिन तिवारी... विजय शेखर गुप्ता निर्मित आणि शमिक मौलिक दिग्दर्शित. संगीत श्रद्धा पंडित यांनी दिले आहे." यापूर्वी हुबेहुब सुशांतसारखा दिसत असल्याने सचिनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


या चित्रपटाविषयी सांगताना निर्माते विजय गुप्ता म्हणाले की, ‘ते या चित्रपटाद्वारे बॉलिवूडला पूर्णपणे एक्सपोज करणार आहे. बाहेरुन अनेक मुले कामाच्या शोधात सिनेसृष्टीत पाऊल ठेवतात. मात्र खूप कमी लोकांना यात यश मिळते. कारण येथे बॉलिवूड गँगचे राज्य आहे. हा चित्रपट सुशांत सिंह राजपूतचा बायोपिक नसून सुशांतच्या जीवनप्रवासाने प्रेरित झालेला चित्रपट असेल. यामुळे सिनेसृष्टीचे खरे रुप लोकांसमोर येईल.’
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.