आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी गांगुलीचे नाव चर्चेत !

02 Jul 2020 15:44:00

sourav ganguly_1 &nb
नवी दिल्ली : जुलैच्या सुरुवातीलाच शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा राजीनामा दिला. त्यांनी सलग ४ वर्षे या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या पदासाठी बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे नाव चर्चेत आहे. सौरव गांगुलीने अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यास त्याचा सामना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कोलीन ग्रावेस यांच्याशी होणार आहे.
 
 
शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर सध्या हंगामी अध्यक्ष म्हणून इम्रान ख्वाजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळ आता लवकरच आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून यासाठी सौरव गांगुलीने सहभाग घेतल्यास त्याला प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे. ७२ वर्षीय कोलीन ग्रावेस हेदेखील या पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. कोरोनाच्या प्रदुर्भावामध्ये जगभरामध्ये क्रिकेटला आलेली मरगळ दूर करण्याचे मोठे आव्हान पुढच्या अध्यक्षांकडे असणार आहे. त्यामुळे आत आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0