सुशांत सिंह राजपूत आत्महत्या : संजय लीला भंसाळींची चौकशी

02 Jul 2020 14:10:46
sushant singh rajput _1&n
मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांची अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलीसांकडून चौकशी केली जाणार आहे. यशराज फिल्ससह केलेल्या करारामुळे दोन सिनेमे भंसाळींनी नाकारले होते, याच पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी केली जाणार आहे.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत बाजीराव मस्तानी आणि रामलीला हे दोन चित्रपटात काम करणार होता. यश राज फिल्मसह केलेल्या करारामुळे त्याला या दोन चित्रपटांमध्ये काम करता आले नाही. खुद्द भंसाळी यांनीही सुशांत या दोन्ही चित्रपटात काम करणार आहे, असे म्हटले होते. परंतू यानंतर दोघांचे संबंध बिघडल्याची चर्चा आहे.



यानंतर सुशांतला चित्रपट सृष्टीतून वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला होता, अशी माहिती पोलीस सुत्रांना मिळाली. त्याची पडताळणी करण्यासाठी भंसाळींची चौकशी केली जाऊ शकते. दरम्यान, अभिनेते शेखर सुमन यांनीही सुशांत सिंह राजपूत याच्या हत्येची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0