'बडवायझर'च्या कर्मचाऱ्याने टँकमध्ये खरंच लघवी केली का ?

02 Jul 2020 15:22:52
Budweiser _1  H


मुंबई : बडवायझर बिअर (Budweiser beer) हा आपला ब्रॅण्ड आहे, असा तोरा दाखवणाऱ्या अनेकांच्या तोंडची चव गेल्या काही काळापासून पळाली होती. ज्या ब्रँडचा ते अभिमानाने उल्लेख करत होते, त्याच्याच कर्मचाऱ्याने केलेल्या एका खुलाशाने मोठी खळबळ माजली होती. कंपनीचा एक कर्मचारी गेली १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होता. ही बातमी सध्या सोशल मीडियावर (social media) वाऱ्यासारखी पसरली आहे. याबद्दल अनेक ट्रेंडही सोशल मीडियावर दिसू लागले आहेत. 



बातमी नेमकी काय होती ?

एका वेबसाईटने ही बातमी दिली. बडवायझरच्या कर्मचाऱ्याने तो १२ वर्षे बिअर टँकमध्ये लघवी करत होतो, त्यानेच ही कबुली दिली. असे या बातमीचे शीर्षक होते. वॉल्टर पॉवेल असे या कर्मचाऱ्याचे नाव असल्याचेही बातमीत म्हटले होते. ही बातमी वाचल्यानंतर जे लोक ही बिअर पित होते, त्यांना पश्चाताप झाला असेल. तर मद्य न पिणाऱ्यांनी अशा लोकांची टिंगल करायला सुरुवात केली. foolishhumour.com, असे या वेबसाईटचे नाव असून यात ही बातमी उपहासात्मक पद्धतीने लिहीण्यात आली होती. या वेबसाईटचे नाव वाचूनच अनेकांना याबद्दल लक्षात आले असेल. फ्रि प्रेस जर्नलनेही याबद्दल वृत्त दिले आहे.


 भारतातील फेकिंग न्यूज या बेवसाइटप्रमाणेच ही वेबसाईट मजेशीर वृत्त प्रसारीत करते. ज्यावर मनोरंजनासाठी फेक न्यूज दिल्या जातात. शिवाय या बातमीत कंपनीची बाजू जाण्यात घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बातमी खोटी आहे, यात काहीही तथ्य नसल्याचं दिसून येते. अनेक वृत्त देणाऱ्या वेबसाईट्सनी याबद्दलचा फॅक्ट चेक केला आहे. असा कर्मचारी कुठेच नसून कंपनीचे म्हणणेही यात मांडलेले नाही. त्यामुळे या दाव्यात कुठलेही तथ्य नसल्याचे उघड झाले आहे.





Powered By Sangraha 9.0