चीनचे घृणास्पद कृत्य : भारतविरोधात दहशतवादी संघटनांना मदत

    दिनांक  02-Jul-2020 12:55:35
|
JK_1  H x W: 0


 नवी दिल्ली : लडाख सीमावादानंतर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतरही चीन आपल्या हरकती सोडत नाही असे दिसत आहे. चीनी लष्कर जम्मू काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी दहशतवादी संघटना अल बद्रला सक्रीय करण्याचा प्रयत्न करत आहे. युएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, अल बद्र दहशतवाद्यांचा समुह चीनी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन परतला अशी माहिती आहे. ही बैठक पाक व्याप्त काश्मीरात झाली.


चीन केवळ पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पाठीशी आर्थिक मदत देऊन उभा राहिलेला नाही. म्यानमारची विद्रोही संघटना अराकन आर्मीलाही चीन फंडींग आणि हत्यारांची मदत करत आहे. बैंकॉक बेस्ड मीडिया कंपनी लिकास न्यूजच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीत या संघटनेला ९५ टक्के फंडींग चीनमधून होत आहे.

 
दक्षिण आशियात भारताला कमजोर बनवण्याचा प्रयत्न


अहवालात म्हटल्यानुसार, अरकान आर्मीद्वारे चीन पश्चिम म्यानमारद्वारे भारताच्या बाजूने असलेल्या सीमेवरील भागात आपले वास्तव्य वाढवू पागत आहे. दक्षिण आशियात भारताला कमजोर करू पाहत आहे. यासाठी म्यानमारमध्ये भारताचा प्रभाव रोखणे गरजेचे आहे.

 
पीओके-गिलगिट-बालिस्तानमध्ये २० हजार सैनिक


पाकिस्तानने पीओके-गिलगिट-बालिस्तानमध्ये २० हजार सैनिक तैनात केले आहेत. भारत-चीन विवादाचा फायदा पाकिस्तान उचलू पाहत आहे. दुसरीकडे पाकिस्तान सातत्याने सीझफायर तोडत आहे. स्थानिक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या भागातून घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत. तसेच दहशतवादीही वारंवार कुरपाती करत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.