हिंदू विरोधी वेब सिरीज बंद करा ! : ट्विटरवर आंदोलन

    दिनांक  19-Jul-2020 20:43:52
|

Hindu Virodhi _1 &nb
मुंबई : सिनेमॅटीक लिबर्टीच्या नावाखाली कथानकात स्वैराचार दाखवून हिंदू धर्मियांच्या श्रद्धांशी चालवलेला खेळ बंद करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वेब सिरीजमध्ये धर्मविरोधी कथानक दाखवून समाजात हिंदू धर्मीयांबद्दल तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप लावण्यात येत आहे. भडक संवाद, बोल्ड सीन आणि हिंदू धर्मीय व सैन्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखवत कथा दाखवत वेब सिरीजच्या नावाखाली कलह माजवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
ट्विटरवर या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. #censor_web_series या हॅशटॅग्स अंतर्गत ही मागणी करण्यात येत आहे. लैला, सेक्रेड गेम्स, पाताललोक, क्रिश्ना अॅण्ड हिज लिला अशा अनेक वेब सिरीजमधून भारताबाहेरील ओटीटी प्लॅटफॉर्म कंपन्या एक प्रपोगंडा निर्माण करू पाहत आहेत का, असा सवालही विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या वेबसिरीजमध्येही सैन्याचा अवमान केल्याचे प्रकरण गाजले होते. यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा प्रश्न आता विचारला जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रख्यात इराणी चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या ‘मुहम्मद : मेसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी रझा अकादमी’ने एक पत्रक प्रसिद्धीस देऊन केली. 
‘डॉन सिनेमा’ या संस्थेकडे ही मागणी करण्यात आली असून २१ जुलै रोजी हीच संस्था डिजिटल माध्यमात हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे. ‘मुहम्मद : मेसेंजर ऑफ गॉड’ हा चित्रपट इस्लामचे अखेरचे प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या जीवनावर आधारित असून त्यात मोहम्मद पैगंबराला शिशुरुपात दाखवत त्याच्या आई-वडिलांचे चित्रण करण्यात आले आहे. ‘रझा अकादमी’च्या आक्षेपाचे कारण हेच असून, इस्लाममध्ये अल्ला किंवा पैगंबराच्या छायाचित्र, मूर्ती व चित्रीकरणाचा निषेध असल्याने र्ईशनिंदा करणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावी, असे त्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणावर मुस्लीम धर्मासाठी वेगळा न्याय आणि हिंदूंसाठी आवाज उठवणारे कुणीच नाही का, असा प्रश्नही विचारला जात आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.