पाच कळस व तीन मजली राम मंदिर अभूतपूर्व असेल

    दिनांक  19-Jul-2020 17:51:35
|

Ram Mandir _1  अयोध्या : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तब्बल नऊ महिन्यांनी पाच ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माण कार्य सुरू होणार आहे. शनिवारी श्रीराम तीर्थ क्षेत्र बैठकीत शिल्यानास, निर्माण आणि मंदिरासंदर्भात आणखी बरेच निर्णय झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिपूजनाला उपस्थिती हा मोठा निर्णय असेल. राम मंदिर आता दुमजली नव्हे तर तीन मजली होणार आहे. 


याची लांबी 268 फूट आणि रुंदी 140 फूट उंच असणाप आहे, तर मंदिराची उंची 161 फूट उंच असेल. मंदिरामध्ये एकूण 318 स्तंभ असतील, तसेच प्रत्येक मजल्यावर 106 मजले असतील. राम मंदिराचा नवा नकाशा वास्तूरचनाकार चंद्रकांत सोमपूरा यांनी तयार केला आहे. 100 ते 120 एकर जमिनीवर पाच घुमट असणारे यासारखे दुसरे मंदिर जगात कुठेही नाही. 

सोमनाथ मंदिर, अक्षरधाम मंदिरांची रचना करणारे चंद्रकांत सोमपुरा यांनी 1987 मध्ये विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. या संपूर्ण मंदिरासाठी १.७५ लाख घनफूट शिलांची आवश्यकता आहे. आता या मंदिराचा नकाशा बदलला असल्याने आणखी सामग्रीची आवश्यकता भासणार आहे. 


मंदिराची उंची वाढवून तीन ऐवजी पाच कळस करणे हे आवश्यक असल्याचे सोमपूरा यांनी सांगितले आहे. संतमहंत आणि ट्रस्टच्या इच्छेनुसार हा बदल करण्यात आला आहे. स्तंभ हा १४ फूट उंच व सहा इच रुंद असणार आहे. प्रत्येक स्तंभात १६ मूर्त्यांचे कोरीव काम केले जाणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.