पवारांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांपुढे पेच ?

19 Jul 2020 19:54:21

Uddhav Thackeray and Shar



मुंबई : आमच्यापुढे कोरोना हा महत्वाचा प्रश्न आहे, राम मंदिर आमचे प्राध्यान्य असू शकत नाही, असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भूमिकेमुळे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे पेच निर्माण केला आहे. रविवारी सकाळापासूनच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राम मंदिर उभारणीत शिवसेनेची भूमिका कशी महत्वाची होती, असे म्हणत आम्हाला भूमिपूजनाच्या आमंत्रणाची चिंता नाही, आमचे नाते रामाशी आहे, असे सवक्तव्या केले होते. 

याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राम मंदिर प्रश्नी वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. आमची प्रार्थमिकता ही कोरोना आहे, काहींना वाटते की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल आम्हाला तूर्त कोरोनाशी लढायचे आहे, असे पवारांनी म्हटल्याने आता शिवसेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहे. शरद पवारांनी घेतलेली भूमिका जरी पक्षाची असली तरीही राज्यात सत्तेत एकत्र असल्याने राजकीय वर्तूळात उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थितीबद्दल वेगळी चर्चा आहे. 

राम मंदिर भूमिपूजनाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून जाणार की, शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून जाणार असाही सवाल विचारला जात आहे. यापूर्वी महाविकास आघाडीला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी अयोध्येला यावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते. त्यावेळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान, यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




Powered By Sangraha 9.0