… तर पद्मश्री पुरस्कार परत करेन! : कंगना राणावत

    दिनांक  18-Jul-2020 15:17:47
|

kangana_1  H xअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी कंगना राणावतचे मोठे वक्तव्य!


मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतने बॉलीवूडमधील बड्या कलाकारांच्या नावाचा उल्लेख करत इंडस्ट्रीतील ‘घराणेशाही’ मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला होता. यासाठी तिने एक व्हिडिओ देखील जारी केला होता. यात कंगना घराणेशाही, स्टार किड्स या सर्व विषयांवर खुलेपणाने बोलली आहे. कंगनाच्या या व्यक्तव्यांचे अनेकांनी समर्थन केले आहे.दरम्यान, याप्रकरणी "मी केलेले दावे सिद्ध करु शकले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करेन," असे मोठे वक्तव्य आता कंगनाने केले आहे. सध्या कंगना तिच्या मूळ गावी मनालीमध्ये असून एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने हे वक्तव्य केले आहे. कंगनाने जारी केलेल्या व्हिडीओनंतर सुशांत प्रकरणात चौकशीसाठी मुंबई पोलीसांकडून सन्मस जारी करण्यात आला असून, प्रश्न उत्तरांसाठी तयार असल्याचेही कंगनाने स्पष्ट केले आहे.


याबद्दल बोलताना कंगनाने सांगितले, "मुंबई पोलीसांनी मला समन्स पाठवला आहे. परंतु, मी मनालीत असल्याने कोणालातरी पाठवून माझा जबाब नोंदवा असेही मी त्यांना सांगितले. परंतु, त्यांच्या बाजूने अद्याप उत्तर आलेले नाही. मी असे काही केले किंवा बोलले असेन की जे मी सिद्ध करु शकत नाही तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेन. कोणत्याही कारणाशिवाय ऑन रेकॉर्ड बोलणाऱ्यातली मी नाही," असेही तिने स्पष्ट केले. दरम्यान मी बोललेल्या गोष्टी अस्तित्वातच नाही, तसे असेल तर सांगा, असेही ती म्हणाली.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.