खेळाडूंसाठी चार्टर्ड प्लेन? आयपीएल विदेशात होण्याची शक्यता...

18 Jul 2020 17:58:16

IPL Dubai_1  H
 
मुंबई : कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून इंडियन प्रीमियर लीगचे १३वे पर्व भारताबाहेर खेळवण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. देशामध्ये कोरोनाचा कहर हा अद्याप कमी आलेला नाही. त्यामुळे आयपीएल भारतामध्ये शक्य होणार नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. पण, बीसीसीआय भारताबाहेर स्पर्धेचे आयोजन करू शकते अशी चिन्ह दिसत आहे. शुक्रवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी आयपीएल दुबईमध्ये आयोजित करण्यावर एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
 
 
आयपीएलचे आयोजन युएईमध्ये होण्यासंबंधित घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. भारत सरकारकडून अधिकृत परवानगी आणि ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतर बीसीसीआय आयपीएलबद्दल आपली घोषणा करण्याची शक्यता आहे. संघ मालकांनी परदेशवारीसाठी तयारीला लागली असून खेळाडूंसाठी चार्टर्ड प्लेनची सोय ते हॉटल बुकींची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही २०१४मध्ये आयपीएलचे अर्धे पर्व दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा तोच फॉर्मुला वापरतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0