प्रभु, आपने कभी बताया नहीं कि आप नेपाली हो! : दीपिका चिखलिया

    दिनांक  18-Jul-2020 17:37:26
|

dipika_1  H x W


मीम शेअर करत ‘रामायणा’च्या सीतेचा नेपाळच्या पंतप्रधानांना टोला!

मुंबई : प्रभू रामचंद्र नेपाळी असून, खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा अजब दावा नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली शर्मा यांनी नुकताच केला होता. त्यांच्या या अजब वक्तव्याचा सगळ्यांची आपापल्या पद्धतीने समाचार घेतला. दूरदर्शनच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी ‘प्रभु, आपने कभी बताया नहीं कि आप नेपाली हो!’ अशी खुमासदार पोस्ट केली आहे.या पोस्टमध्ये दीपिका चिखलिया यांनी रामायण मालिकेतला एक फोटो मीम ट्विट केला आहे. या फोटोत प्रभू रामचंद्र (अरुण गोविल), लक्ष्मण (सुनील लहरी) आणि हनुमान (दारासिंग) दिसत आहेत. त्या फोटोवर ‘प्रभु, आपने कभी बताया नहीं आप नेपाली हो!’ असा संवाद दिसत आहे. ‘ही गोष्ट ऐकून हनुमानालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे’, असे कॅप्शन देत दीपिका यांनी हे मीम शेअर करत ओली यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.