प्रेम की हनी ट्रॅप ! उस्मानाबादचा तरुण प्रेयसीसाठी पाक सीमेवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jul-2020
Total Views |

झिशान _1  H x W





उस्मानाबाद : भारतीय सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाकीस्तान सीमेवरुन एका मुलाला ताब्यात घेतले आहे. मुळचा उस्मानाबादचा असलेला हा झिशान सिध्दिकी सीमेवर आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला गेला होता. पाकिस्तानी सीमेवर ९.३० वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकी घेऊन निघाला. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा ? याचा तपास पोलीस घेत आहेत. 


प्रार्थमिक माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात दुचाकीवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानात जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील कथित प्रेयसीला भेटण्यासाठी सीमारेषा ओलांडून पाकिस्तानकडे जाण्याची झिशानची इच्छा होती. कथित प्रेयसीला भेटायला बीएसएफने पाकिस्तान आणि कच्छ सीमेपलीकडे फिरत असलेल्या युवकाला पकडले. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. 


मुलाचे वडील मौलाना आहेत असून तो इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. जाताना हा उस्मानाबाद ते अहमदनगर जिल्ह्यातील पर्यंत सायकलवर गेला. तिथून त्याने दुचाकी घेतली. याची माहिती कळाल्यावर एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई टीम कार्यान्वीत झाल्या. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला. त्याचा लॅपटॉप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते.












@@AUTHORINFO_V1@@