रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी!

    दिनांक  16-Jul-2020 17:34:40
|
Reha_1  H x W:


सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी


मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आता एक महिना झाला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. अनेक सेलिब्रिटींची चौकशी देखील मुंबई पोलिसांनी केला आहे. मात्र आता सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. रियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना याबाबत विनंती केली आहे.


रियाने इन्टाग्रामवर सुशांतसिंह राजपूत आणि तिचा फोटो शेअर करत लिहिलं की, "अमित शाह सर, मी सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती. सुशांतच्या मृत्यूला आता एक महिना झाला आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. तरीही न्यायासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी. मला केवळ हे जाणून घ्यायचे आहे की सुशांतने कोणत्या दडपणाखाली हे टोकाचं पाऊल उचललं."


याआधी रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, त्यात तिने तिला मिळणाऱ्या धमक्यांबाबत माहिती दिली. रियाने पोस्ट करत तिला बलात्कार करण्याची आणि जीवेमारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे सांगितले. रिया चक्रवर्तीचे म्हणणे आहे की, तिला याआधी अनेक शिव्या देण्यात आल्या, तिला खूनीही म्हटले गेले. ती शांत बसली. परंतु, आता बलात्कार आणि जीवेमारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. तसेच तिला आत्महत्या करण्यासही सांगण्यात येत आहे. त्यामुळेच तिने सायबर सेलमध्ये यासंदर्भात तक्रार केली असून पोलिसांकडेही मदत मागितली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.