रामललाच्या मंदिरासाठी शिलान्यास तयारी सुरू

16 Jul 2020 13:46:58

Ram Mandir _1  







अयोध्या
: अयोध्येत रामलीला मंदिर शिलान्यास लवकरच होणार असल्याचे संकेत मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सुरक्षा प्रमुख असलेले राजस्थान कॅडर आयपीएस के.के.शर्मा अयोद्धेत पोहोचले आहेत. त्यांनी ७० एकर जमिनीवर तयार होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. ते चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. एक तासाहून अधिक काळ इथल्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती त्यांनी घेतली. 


यानंतर कारसेवकपुरम, रामसेवक पुरम आणि श्रीराम जन्मभूमि न्यास कार्यशाळा या भागाची पाहणी केली. यावेळई श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महामंत्री चंपत रायही उपस्थित होते. स्थानिक पोलीस प्रशासनही यावेळी उपस्थित होते. निर्माण समितिचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या आग्रहानंतर ७० एकर परिसरात नवी सुरक्षा योजना बनवली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर बनण्यापासून ते काम संपूर्ण होईपर्यंत सुरक्षा व्यवस्था कशी असेल याचा आढावा घेण्यात येणार आहे. 


श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक १८ जुलै रोजी होणार आहे. अंतर्गत तयारी सुरू झाली आहे. ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांच्या मते, निर्माण समिति अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा लवकरच अयोद्धेला येतील. तसेच बैठकीची तयारीही सुरू करतील. या बैठकीत राम मंदिर निर्माण शुभारंभाची तारीख निश्चित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबद्दल माहिती दिली जाणार आहे. के. पराशरण, प्रयागराजचे स्वामी वासुदेवानंतद सरस्वती तसेच पेजावर मठ उडपीचे जगत् गुरू माधवाचार्य स्वामी, विश्व प्रपन्नाचार्य महाराज आदींची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती राहणार आहे.






Powered By Sangraha 9.0