‘रुग्णसेवा करा आणि मिळावा ५ हजार’ ; कर्नाटकची नवी योजना

16 Jul 2020 10:00:25
 
karnataka_1  H
 
 
 
कर्नाटक : कोरोनाग्रास्तांची संख्या देशभरामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप कोरोनावर लस उपलब्ध नसल्याने कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी अनेक राज्यांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्लाझ्मा पद्धतीचा अनेक राज्यांमध्ये वापर केला जात आहे. कर्नाटक सरकारने यासंदर्भात एक नवी योजना काढली असून कोरोना विषाणूमधून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे यासाठी सरकारतर्फे ५ हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
 
 
 
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माच्या मदतीने कोरोना रुग्णांवर उपचार केला जात आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन विविध राज्य सरकारांमार्फत केले आहे. त्यापैकी कर्नाटक राज्याने दान करणाऱ्यांना बक्षीस म्हणून ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षा मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की, “राज्यामध्ये आतापर्यंत १७,३९० रुग्ण बरे झाले आहेत. ज्यापैकी ४९९२ रुग्ण बंगळुरुचे आहेत. त्यांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0