अमिताभ बच्चन यांचा कवितेतून डॉक्टरांना सलाम!

    दिनांक  16-Jul-2020 15:23:04
|
Amitabh Bachchan _1 


कोरोना उपचार घेणाऱ्या बिग बींनी व्यक्त केली कृतज्ञता!

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात असले तरी बिग बी सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट करत डॉक्टर व नर्सेसना सलाम केला आहे.


स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकटातही रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्ससाठी त्यांनी या ओळी लिहिल्या आहेत. इतरांची सेवा करणारे हे डॉक्टर व नर्सेस पूजनीय असल्याचे त्यांनी या कवितेतून म्हटले आहे.

‘दरम्यान, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावे लागणार आहे’, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे, तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्याना घरातच क्वारंटाइन करण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.