सुशांत सिंह राजपूत आत्महत्या : सलमानची चौकशी करण्यास मुंबई पोलिसांचा नकार

    दिनांक  15-Jul-2020 15:49:58
|

salman_1  H x Wसुशांतच्या आत्महत्येप्रकारणी सलमानची चौकशी करण्याची याचिका फेटाळली!


मुंबई : सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई जोरात सुरू आहे. संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या बड्या व्यक्तींसह आतापर्यंत एकूण ३५ जणांची चौकशी करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीसह, त्यांच्या इतर मित्र कुटुंबीयांचीही पोलिसांनी चौकशी केली. मात्र या प्रकरणात सलमानला समन्स बजावण्याची याचिका कोर्टाने फेटाळून लावली. ही याचिका मुजफ्फरपूरचे सुधीर ओझा यांनी दाखल केली होती.


त्याचबरोबर मुंबई पोलिसांनीही अभिनेता सलमान खानची चौकशी करण्यार नसल्याचे म्हंटले आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सलमान खानला समन्स बजावले जाणार नाहीत, असे डीसीपींनी म्हटले आहे. सलमान खान आधी सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत चित्रपटात होता पण नंतर त्याने हा चित्रपट बनविला नाही, असा आरोप केला जात आहे. अलीकडेच सलमान आणि बॉलिवूडमधील अनेक बड्या व्यक्तिमत्त्वांसाठी काम केलेल्या मॅनेजर रेश्मा शेट्टी यांची पोलिसांकडून चौकशी केली गेली आहे. रेश्माची वांद्रे पोलिस ठाण्यात सुमारे पाच तास चौकशी झाली.


२०१० पासून रेश्मा सलमानची मॅनेजर म्हणून कार्यरत होती. २०१८ नंतर तिने अक्षय कुमारसाठी काम करण्यास सुरवात केली. तर ती सध्या आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यासोबत काम करत आहे. कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबराचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.


घराणेशाहीप्रसार करणार्‍या सलमान खानने सुशांतसिंग राजपूतकडे दुर्लक्ष केले आणि सूरज पंचोलीला प्रसिद्धी देण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केल्याची बरीच चर्चा माध्यमांमधूनही झाली. पंचोलीमुळे सलमानने सुशांतचा अपमान केला होता, असे माध्यमांच्या वृत्तांत म्हटले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.