दिवंगत अरुण जेटली यांच्या नावे कर्मचारी कल्याण योजना...

15 Jul 2020 16:57:05

Arun Jaitley_1  
 
 
नवी दिल्ली : भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या नावाने कर्मचारी कल्याण योजना सुरु करण्यात येणार आहे. राज्यसभेचे सदस्य असलेल्या जेटली यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनातून या योजनेसाठी निधी देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सचिवालयातील 'सी' गटातील कर्मचार्यांनच्या मुलांना उच्च तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणासाठी तीन शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मृत्यू आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहेत.
 
 
 
 
 
दिवंगत भाजप नेते अरुण जेटली यांची मुलगी सोनाली जेटली बक्षी यांनी ट्विट केले की, “माझे वडील अरुण जेटली यांना असा विश्वास होता की, शिक्षण केवळ एक अधिकार नाही तर नवीन भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी ते आवश्यक देखील आहे. म्हणूनच, आम्ही त्यांची पेन्शन राज्यसभा सचिवालयातील 'सी' गटातील कर्मचार्यां ना दान केली आहे. जेणेकरून कर्मचार्यां च्या मुलांना कल्याणकारी योजना आणि शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकेल. वडिलांच्या आदर्शांचा आदर करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.”
Powered By Sangraha 9.0