आयपीएल २०२० साठी काहीही ! काही दौरे आणि मालिका करणार रद्द ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jul-2020
Total Views |

bcci IPL_1  H x
नवी दिल्ली : भारतामधील क्रिकेट चाहत्यांसाठी इंडियन प्रीमियर लीग हा एक सोहळा आहे. कोरोनामुळे आयपीएल स्पर्धेबाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे आहेत. एकीकडे आयपीएल आयोजनासाठी आशिया चषक रद्द केल्यानंतर आता भारतीय संघाचे दौरेदेखील रद्द करण्याचा विचार बीसीसीआय करत असल्याचे सांगितले जात आहे. भारताला आयपीएलमधून हजारो कोटींची कमाई होते. आयपीएलचे आयोजन भारतात झाले नाही, तर ४-५ हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आयपीएल व्हावी यासाठी बीसीसीआय आग्रही आहे.
 
 
आयपीएल खेळण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आशिया चषक स्पर्धाही रद्द केलेली आहे. भारताच्या दौऱ्यावर इंग्लंडचा संघ सप्टेंबर महिन्यामध्ये येणार होता. पण या महिन्यात बीसीसीआय आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे हा भारताचा दौर रद्द करण्याचा निर्णय इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने घेतला असल्याचे डेली मेल या वृत्तपत्राने सांगितले. तसेच, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरादेखील रद्द करण्याचा विचार सध्या चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@