रेखाला कोरोना चाचणीचा पालिकेचा सल्ला!

    दिनांक  15-Jul-2020 11:24:11
|
Rekha_1  H x W:


चाचणीसह, बंगल्यात सॅनिटाइज करण्यासही रेखा यांनी केली होती मनाई


मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. रेखा यांचा एक सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, पालिकेने हा सल्ला दिला आहे. प्रकृतीच्या दृष्टीने रेखा यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि कोरोना चाचणी केली तर तसे पालिकेला कळवावे, असे पालिकेने सांगितले आहे. रेखा यांचा सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत तसेच हा रक्षक रेखाच्या बंगल्याच्या आवारात जिथे राहत होता त्या ठिकाणी पालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.


रेखा यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्यावर त्याची संपर्कात आलेल्या इतरांचीही चाचणी करण्यासाठी पालिका कर्मचारी रेखा यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र रेखा यांनी चाचणी करून घेण्यास नकार दिला होता. तसेच बंगल्याच्या आतील बाजूस सॅनिटाइज करण्यासही मनाई केली होती. त्यावेळी बाहेरच्या बाजूस सॅनिटाइज करून आपले काम पूर्ण केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.