मुंबई : महाविकास आघाडीत बकरी ईद साजरी करण्यावरून धुसफूस सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता हा सण साजरा करण्यास परवानगी दिली आहे. साधेपणाने सण साजरा करावा, नियमांचे पालन करावे तसेच प्रतिकात्मरित्या सण साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, "गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी. सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत आणि आपण त्याला साथ द्यावी."