पुण्यामध्ये १४ जुलैपासून कडक लॉकडाऊन !

14 Jul 2020 10:58:57

Pune_1  H x W:
 
 
पुणे : राज्यात पुणे शहरामध्ये दिवसागणिक कोरोनग्रास्तांची संख्या वाढत आहे. ही वाढणारी कोरोना रूग्णांची स्थिती पाहता आता पुणे शहरामध्ये पुणे मनपा कडून १४ जुलै ते १९ जुलै आणि १९ जुलै ते २३ जुलै असा दहा दिवसांचा लॉकडाऊन २ टप्प्यांत पुन्हा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १४ जुलैच्या मध्यरात्री १ वाजल्यापासून लॉकडाऊन पुन्हा कडक करण्याचे आदेश दिल्यानंतर आता सकाळपासून पुण्यातील नाक्यांवर चोख बंदोबस्त ठेवला जात आहे. तसेच वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन पुणे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, मंगळवारपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये १८जुलै पर्यंत पुणेकरांना सर्व किराणा माल दुकान, व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे. १९ जुलै पासून किराणा माल दुकाने सकाळी ८-१२ या वेळेत सुरू राहतील. तर या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी पूर्ण क्षमतेने सेवेत असतील. तर उद्योग आणि आयटी कंपनीमध्ये १५% मनुष्यबळासह कार्यालये सुरू राहणार आहेत. मात्र इतर अनावश्यक गर्दी टाळून कोरोनाचा पुणे शहरातील फैलाव रोखण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0