'जिओ'मध्ये 'गुगल' करणार ३० हजार कोटींची गुंतवणूक

    दिनांक  14-Jul-2020 18:37:30
|

Jio_1  H x W: 0नवी दिल्ली : जगातील अग्रगण्य टेक कंपनी मानली जाणारी 'गुगल' रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दलच्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात गुगल तब्बल ४ अब्ज डॉलर (३० हजार कोटी रुपये) इतकी मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


याबद्दल दोन्ही कंपन्यांकडून सविस्तर किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, गुगलने रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केल्यास ही कंपनीची १४ वी मोठी गुंतवणूक असेल तर दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. यापूर्वी फेसबूकने जिओशी ४३ हजार कोटींची भागिदारी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये बुधवारी सर्वसाधारण सभा होणार आहे. यावेळी अध्यक्ष मुकेश अंबानी याबद्दल अधिकृत माहिती देऊ शकतात. रिलायन्स इंडस्ट्रजने आपली हिस्सेदारी विकून आत्तापर्यंत १.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.