गुगलने हटवले ११ धक्कादायक अॅप ! युझर्सनाही हटवण्यास सांगितले...

14 Jul 2020 10:00:27

google_1  H x W
 
 
नवी दिल्ली : मोबाईलच्या माध्यमातून अनेकवेळा विविध अॅपमधून हॅकींग होण्याची भीती असते. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप आहेत ज्यांच्या माध्यमातून युझर्सचा स्मार्टफोन हॅक करतात. असे काही धोकादायक अॅप गुगल प्ले स्टोरवरून काढून टाकण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. यामध्ये ११ अॅप्सचा समावेश आहे. ज्या माध्यमातून युझर्सला न कळता कधी-कधी क्रेडिट-डेबिट कार्डमधून पैसेही कट होऊ शकतात. तसेच यामधून युझर्सच्या परवानगीशिवाय त्यांच्या फोनमधून प्रीमिअम सर्व्हिससाठी सब्सक्राईब केले जाते.
 
 
 
चेरी मेसेज, रिलॅक्ससेशन मेसेज, मेमरी गेम, लविंग मेसेज, फ्रेंड एसएमएस, कॉन्टॅक्ट मेसेज, कॉम्प्रेस इमेज, अॅप लॉकर, रिकव्हर फाईल आणि रिमाइंड अलार्म - अलार्म आणि टायमर अशा अॅप्सचा समावेश आहे. २०१७पासून गुगलचे या अॅपवर लक्ष होते. हे सर्व अॅप जोकर मालवेअरपासून इन्फेक्टेड आहेत. या अॅपला २०१७ला गुगलने ट्रॅक केले होते. हे सर्व अॅप अनेक वर्षांपासून गुगलच्या प्ले स्टोअर प्रोटेक्शनच्या नजरेतून स्वत: चा बचाव करत आहेत. युझर्सने किमान पाच लाख वेळा हे अॅप डाऊनलोड केले आहेत. आता युझर्सलाही हे अॅप डिलिट करण्यास सांगण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0