बालाजी मंदिराच्या दानपेटीत इतक्या कोटींच्या जुन्या नोटा

14 Jul 2020 18:15:31
Balaji _1  H x



तिरुपति : नोव्हेंबर २०१६मध्ये नोटाबंदीनंतर चलनातून हद्दपार झालेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटा आजही मंदिरात दान केल्या जात आहेत. आंध्रप्रदेशातील तिरुपति बालाजी मंदिरात तब्बल ५० कोटींचे दान जुन्या नोटांच्या स्वरुपात केले जात आहे. तिरुपती ट्रस्टचे चेअरमन वाईवी सुब्बारेड्डी यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन या जुन्या नोटा बदलून देण्याची मागणी केली आहे. 

कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये तिरुपती बालाजी मंदिरात दानाचा ओघ कमी झाला. ११ जूनपासून मंदिर खुले झाल्यानंतर तब्बल १७ कोटींचे दान जमा झाले. कोरोनापूर्वी येणाऱ्या दानाच्या १० टक्केसुद्धा ही रक्कम नाही. मंदिराला आर्थिक मदत म्हणून पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बदलून देण्याची मागणी केली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी झाल्यानंतरही अनेक भाविक या नोटा दान करत होते. तसेच या नोटा बदलण्याच्या मुदतीनंतर पाठवण्यात दानात येऊ लागल्या आहेत. ५० कोटींची जुन्या नोटांची रक्कम सांभाळणेही ट्रस्टला मोठे आव्हान बनत चालले आहे. 

मंदिरातील काही कर्मचाऱ्यांच्या मते, या नोटा बऱ्याच काळापासून दानपेटीत येत आहेत. लॉकडाऊनमध्ये विशेष सवलत म्हणून सरकारकडे याबद्दल मागणी केली जाऊ शकते. तसे झाल्यास मंदिर प्रशासनाला मोठी राहत मिळणार आहे. मंदिर प्रशासानाने याबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. जनसंपर्क कार्यालयाच्या मते, याबद्दल अधिकृत माहिती देण्यास मनाई करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांच्या भेटीबद्दल अधिकृत घोषणा मंदिराने केलेली नाही. मात्र, जुन्या नोटा दानात येत असल्याबद्दल स्पष्टपणे नकारही दिलेला नाही. 


२० वेबसाईटवर कारवाई


तिरुपती बालाजी ट्रस्टच्या नावावर चालवल्या जाणाऱ्या एकूण २० बनावट वेबसाईटवर कारवाई केली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करत कडक कारवाईची मागणी केली आहे. साईट्स दर्शन, हॉटेल बुकींग, ऑनलाईन हुंडी या सारख्या कामांसाठी भाविकांचे पैसे लुबाडण्याचे काम केले जात होते.
 




Powered By Sangraha 9.0