'अजान' स्पीकरवर का ? प्रश्न विचारला म्हणून बलात्काराची धमकी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

AJAN_1  H x W:





मुंबई : मानखुर्दमध्ये मशिदीत लाऊड स्पीकरवर अजानाचा मुद्दा राज्यभर गाजत असताना स्वतःला कट्टर म्हणवणाऱ्या काही समाज कंटकांनी याबद्दल बोलणाऱ्यांना धमकावण्याची सुरुवात केली आहे. एका मुलीने स्पीकरवर अजान का, असे पोस्टर शेअर केल्यानंतर तिला फरदीन या मॉडेलने बलात्काराची धमकी दिली आहे. या संदर्भात त्याने केलेले मेसेज सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. 


काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. हातात घेतलेल्या एका पोस्टरवर तिने एक प्रश्न विचारला आहे. "अजान करा पण आवाज कमी ठेवा, लाऊड स्पीकरवर अजाण करून काय सिद्ध करू इच्छिता ?", असा आशय त्यावर लिहीला होता. या फोटोवर फरदीन नामक इन्स्टाग्राम युझरने मुलीला धमकी दिली. अतिशय आक्षेपार्ह भाषेत त्या मुलीला त्याने लक्ष्य केले. फरदीन मोडल नाव आहे माझं, जे काही करायचं असेल ते कर, कट्टर मुस्मीम कुणाच्या बापाला भीत नाही."



हा फोटो तिने ट्विटरवर २८ जून रोजी शेअर केला. सुहेल खान नामक एका मुलाने तिच्याबद्दल अभद्र टीपण्णी केली. करीश्मा भोसलेच्या समर्थनात तिने हा फोटो अपलोड केला होता. "करीश्माला माझा पूर्ण पाठींबा आहे. लाऊड स्पीकरवर फ्रिक्वेंसीसाठी नियमावली असायला हवी. अशाप्रकारे लाऊडस्पीकरवरील आवाजामुळे आमची मानसिक आणि धार्मिक शांतीवर प्रभाव पडतो." या पोस्टनंतर इस्लामिक कट्टरपंथीयांकडून तिला धमक्या मिळायला सुरुवात झाल्या आहेत. लोकांनी स्क्रीनशॉट्स शेअर करत संंबंधित मुलीसाठी न्याय मागितला आहे. सोशल मीडयावर इंदुर पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे फरदीनबद्दल तक्रार करण्यात आली आहे. 



दरम्यान, अजान प्रकरणी बिग बॉस फेस प्रीतम सिंह यांनीही आवाज उठवला आहे. फेसबूक पोस्टवर अजान लाऊडस्पीकर प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. मुंबई किंवा देशभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे एका ठिकाणी चार ते पाच मशिदी आहेत. त्यांच्यावर असलेल्या बेकायदेशीर भोंग्यांतून दिवसभरात वारंवार अजान ऐकवली जाते. तसेच त्यात स्पर्धाही सुरू असते की, कुणाचा आवाज हा जास्त आहे.  





@@AUTHORINFO_V1@@