आयसीसशी संबंधाच्या संशयातून पुण्यात दोघांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

ISIS_1  H x W:
पुणे : आयसीसशी संबंध असल्याच्या संशयातून पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. ही कारवाई इस्लामिक स्टेट्स (आयसीस) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरुन झाली आहे, अशी माहिती देण्यात येत आहे.
 
 
 
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने केलेल्या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली आहे. बेकायदा हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यानुसार (यूएपीए) कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा संबंध आहे. महिलेचे वय २१ आणि पुरुषाचे वय २७ आहे. दिल्ली येथील “एनआयए”चे पथक रविवारी पुण्यात आले होते. दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि विश्रांतवाडी पोलिसांच्या मदतीने “एनआयए”ने या दोन संशयितांना अटक केली.
 
  
@@AUTHORINFO_V1@@