कोरोना काळातील पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ‘या’ नियमाचे उल्लंघन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2020
Total Views |

ICC_1  H x W: 0
 
 
नवी दिल्ली : जगभरामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव झाला, सर्व जग स्तब्ध झाले. सर्व क्रीडा सामने जवळजवळ ४ महिने बंद होते. मात्र, त्यानंतर पहिल्यांदा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये मोठ्या कालावधीनंतर कसोटी सामना खेळवण्यात आला. हा सामना सुरु होण्याआधी आयसीसीने कोरोणाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून नवी नियमावली केली. तरीही, काही खेळाडूंनी या नियमाचे पालन केले नसल्याचे या सामन्यामध्ये दिसून आले.
 
 
 
 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आयसीसीने काही नवे आणि महत्त्वाचे नियम केले आहेत. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे, चेंडू चमकवण्यासाठी कोणत्याही खेळाडूने लाळेचा म्हणजेच थुंकीचा वापर करू नये. मात्र, याच सामन्यादरम्यान इंग्लंडचा तेज गोलंदाज जेम्स अँडरसन हा थुंकीचा वापर करत असल्याचा व्हिडियो समोर आला आहे. त्यामुळे आता या गोष्टींमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
 
 
 
 
 
वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये वेस्ट इंडीजने सामना जिंकला. मात्र, यावेळी काही वेळेस खेळाडूंमध्येही सोशल डिस्टंसिंगचे नियमदेखील पाळले गेले नसल्याचे निदर्शनास आले. वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर यानेदेखील नाणेफेकीदरम्यान इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स याच्यासोबत हस्तांदोलन करण्यास पुढे सरसावला. यामुळे आयसीसीला पुन्हा एकदा आपल्या नियमांवर विचार करण्याची गरज असल्याचे क्रीडा तज्ञांकडून बोलले जात आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@