सीपीएम सोडून केला भाजपमध्ये प्रवेश : हत्येनंतर मृतदेह टांगला झाडाला

13 Jul 2020 17:06:40
Roy Death _1  H




कोलकाता : ममता सरकारच्या काळात भाजप नेत्यांची हत्या होण्याच्या घटना आजवर संपूर्ण देशाने पाहिल्या आहेत. मात्र, सोमवारी उघडकीस आलेल्या घटनेमुळे लोकशाहीची पाळेमुळेच कम्युनिस्ट पक्ष आणि ममता सरकार प्रयत्न करत आहेत, का असा सवाल विचारला जात आहे.



भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या देबेंद्र नाथ रॉय यांची हत्या करून मृतदेह फासावर लटकण्यात आला. पोलीसांनी मात्र, ही आत्महत्या असल्याचा दावा करत मृतदेहाकडे चीठ्ठी सापडली असून तिघांना दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 



देवेंद्र नाथ यांचा मृतदेह बिंदल गावात त्यांच्या घरापासून तब्बल एक किमी दूरवर एका दुकानाबाहेर लटकवण्यात आला होता. हत्येनंतर त्यांचा मृतदेह अशाप्रकारे लटकण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. रात्री १ वाजता काहीजण दुचाकीवरून घरी आले. रॉय त्यांच्यासोबत गेले होते. २०१६मध्ये हेमताबाद विधानसभा मतदार संघातून सीपीआय (एम) या पक्षातर्फे त्यांनी निवडणूक जिंकली होती. मात्र, लोकसभा निवडणूकीनंतर ते भाजपमध्ये आले होते. 



भाजपमध्ये येणे हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ?
 
भाजप नेते कैलाश विजय वर्गीय .यांनी ममता बँनर्जी यांच्या कार्यकाळात भाजप नेत्यांची हत्या होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाहीत. भाजपमध्ये प्रवेश करणे हाच गुन्हा आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे.







Powered By Sangraha 9.0