राहुल गांधींना 'पप्पू' म्हणायला सुरुवात करणाऱ्या नेत्याला पाहून घ्या !

13 Jul 2020 16:22:01

Rahul Gandhi and Navjyot



नवी दिल्ली : राहुल गांधींना पप्पू या नावाने टार्गेट केले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो. मात्र, याच वक्तव्याला भाजप खासदार सी. आर. पाटील यांनी उत्तर दिले आहे. राहुल गांधींना पप्पू म्हणणाऱ्या नेत्याला पाहून घ्या, असे सांगत त्यांनी काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांचा फोटो ट्विट केला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी ठेवलेले हे नाव सोशल मीडियावर ट्रोल झाले. सी.आर.पाटील हे भाजपचे बिहार राज्याचे प्रभारी आहेत. तसेच नवसारी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत.




Powered By Sangraha 9.0