जातीयवादी कोरोना मंडळी

12 Jul 2020 21:55:24

nitin raut_1  H


जात, पात, धर्म यापलीकडे जाऊन देशनिष्ठायुक्त मानवतावादी काम करणारी लोकं रेशीमबागेत आहेत. नितीन राऊतांसारखे लोकं ब्राह्मणांना शिव्या देत असतात, अचानक यांना विकास दुबेचा पुळका आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाने लोक हैराण आहेत. त्यासाठी रा. स्व. संघ अहोरात्र काम करत आहे आणि नितीन राऊत यांसारखे लोक या कठीण काळातही जात-पात विद्वेष माजवत आहेत. कोरोना तर आता आला. पण गेली कित्येक वर्षे ही असली ‘जातीयवादी कोरोना मंडळी’ महाराष्ट्राला विळखा घालून आहेत. यांचे काय?


महाविकास आघाडीचे मंत्री नितीन राऊत यांना विकास दुबेचा पुळका आला. विकास दुबेची जात शोधत नितीन राऊत म्हणाले की, विकास दुबेचे एन्काऊंटर खरे की खोटे माहिती नाही. पण उत्तर प्रदेश पोलिसांना ब्राह्मण हत्येचे पाप लागणार, अशी कुजबूज रेशीमबागेजवळ चालू आहे म्हणे.बाबासाहेबांनी जन्मावरून केलेल्या जातीयतेचा नेहमी विरोध केला. पण नितीन राऊतांसारखी लोकं बाबासाहेबांचे नाव घेत जातीय तेढ वाढवत असतात. वर मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या डोक्यावर बसतात. नितीन राऊत यांचे सगळे आयुष्य जातीपातीच्या अत्यंत हिनकस विद्वेषाने पछाडलेले आहे. गुन्हेगार हा कोणत्याही जातीचा नसतो. नव्हे नव्हे नितीन यांनी ज्या पक्षाचा मळवट भरला आहे, तो पक्ष तर सदान्कदा बोंबलत असतो की, बॉम्बस्फोट, दहशतवाद यामध्ये जरी विशिष्ट धर्माचे लोक गुन्हेगार म्हणून सापडले तरी तसे बोलू नका. कारण, गुन्हेगाराला धर्म नसतो. असे असूनही याच पक्षाच्या मंत्र्याने गुन्हेगाराची जात शोधली!



का? विशिष्ट जातीचा उल्लेख केल्यावरच जातीयता असते का? ब्राह्मण, मराठा ते मागासवर्गीय, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती वगैरे कोणत्या जातीत जन्म घ्यावा हे कोणाच्या हातात आहे का? जसे नितीन राऊत यांच्या हातात नव्हते तसेच विकास याच्याही हातात नव्हते. कुणाला वाटेल नितीन राऊत यांच्या विधानातले रेशीमबाग म्हणजे काय? तर नितीन यांच्या मनातले रेशीमबाग ठिकाण म्हणजे तेथील संघ कार्यालय असावे. कारण, नितीन राऊतांसारख्या मंडळींचे अख्खे सत्ताकारण रा. स्व. संघाची निंदा करूनच भरून पावते. राऊत यांना कोणी सांगावे की, विकास मेला म्हणून रेशीमबागेत कुजबूज व्हायला तिथे यांच्यासारखे रिकामटेकडे जातीयवादी कुणीही नाही. जात, पात, धर्म यापलीकडे जाऊन देशनिष्ठायुक्त मानवतावादी काम करणारी लोकं रेशीमबागेत आहेत. नितीन राऊतांसारखे लोकं ब्राह्मणांना शिव्या देत असतात, अचानक यांना विकास दुबेचा पुळका आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाने लोक हैराण आहेत. त्यासाठी रा. स्व. संघ अहोरात्र काम करत आहे आणि नितीन राऊत यांसारखे लोक या कठीण काळातही जात-पात विद्वेष माजवत आहेत. कोरोना तर आता आला. पण गेली कित्येक वर्षे ही असली ‘जातीयवादी कोरोना मंडळी’ महाराष्ट्राला विळखा घालून आहेत. यांचे काय?


काका अमुचे सत्यवचनी!



शिवसेना नसती तर भाजपचे ४०-५० आमदारपण निवडून आले नसते. खरे म्हणतो मी. मी कधीच खोटे बोलत नाही. नसतेच आले? आले नसतेच, किंबहुना आलेच नसते. अरे हे मी काय असे बोलतोय. आमच्या वांद्रेच्या नव्या पुतण्याचे वाण नाही पण गुण लागले की काय? तर जाऊ दे. मी काय म्हणत होतो, शिवसेना नसती तर भाजपचे इतके आमदार निवडून आले असते का? यात काय खोटे बोललो? नरो वा कुंजरवा. समजून जा, असे बारामतीचे काका मनात नक्कीच म्हणत असणार. तो सलमान खानचा सिनेमा आहे ना ! तो म्हणतो, जो मैं बोलता हूं वो करता हूं और जो नही बोलता हूं वो डेफिनेटली करता हूं. यांचेही असेच काहीसे मिळते जुळते आहे. ते जे बोलतात ते ते करत नाही आणि जे बोलत नाही ते डेफिनेटली करतात. तर जाऊ दे, ते काय खोटं बोललो ते सांगा बघू. अहो, सगळ्यांनी पाहिले की, कोण काम करते, कोण काम करत नाही, उद्या काय बाका प्रसंग आला तर कोण आपल्या बाजूने उभे राहील? कोण नाही.


त्या न्यायाने जनतेने भाजपवाले काम करतात म्हणून भाजपला भरभरून मते दिली. मागच्या काळात या आमदारांची सर्वात जास्त चर्चा एकाच कारणासाठी झाली. कोणते कारण म्हणता? तर त्यावेळी एक गाणेही जोरात होते
खिसा कशासाठी कशासाठी
राजीनामा ठेऊन भाजपला त्रास देण्यासाठी
तर खिशातली ‘राजीनामा टर्म’ खूप गाजली. या राजीनाम्याच्या नाटकाआड बिचार्‍यांना काम करायला वेळ कुठे मिळाला. पण त्यांना वेळ नसला म्हणून काय झाले, जनता तर सगळे पाहत होती. त्यांनी काहीच काम न करता, भाजपच्या कामाचे श्रेय लाटणारे आणि वर भाजपलाच अहोरात्र नावे ठेवणार्‍या अजब आमदारांचे गजब वर्तन पाहिले. त्याच वेळी जनतेने यांचे नाकर्तेपण पाहून ठरवले हीच ती वेळ, भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून देण्याची. हे काकांनीही पाहिले. त्यामुळेच ते म्हणाले की, शिवसेनेची साथ नसती तर भाजपचे ४०-५० आमदार निवडून आले असते. काका तुम्ही खरे सत्यवचनी आहात.
Powered By Sangraha 9.0