अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन आणि आराध्याही कोरोना पॉझिटीव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jul-2020
Total Views |
Aishwarya and Aradhya Bac




मुंबई : बच्चन कुटूंबियांची सून आणि प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व मुलगी आराध्या यांचा दुसरा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. शनिवारी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ऐश्वर्या आणि आराध्या व जया बच्चन यांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली होती.




कोरोनाच्या दुसऱ्या चाचणीत बच्चन यांची सून ऐश्वर्या बच्चन व नात आराध्या या दोघीही कोरोना पॉझिटीव्ह आल्या आहेत. बच्चन कुटूंबियांसाठी देशभरातून चाहत्यांनी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन आणि ज्युनिअर बच्चन अभिषेक बच्चन यांचा कोरोनाचा दुसरा अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. दोघेही सध्या नानावटी रुग्णालयात दाखल असून बच्चन यांना कोरोनाची काही लक्षणे आढळले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 



बच्चन यांच्या संपूर्ण परिवारासह कर्मचाऱ्यांचेही स्वॅब जमा करण्यात आले आहेत. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा दुसरा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. बच्चन यांच्या बंगल्याचे निर्जंतूकीकरण पालिकेकडून करण्यात आले आहे. गेल्या १० दिवसात बच्चन यांच्याशी तब्बल ३० जण संपर्कात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. 

सकाळी पालिकाचे पथक जलसा बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर निर्जंतूकीकरण प्रक्रीया सुरू करण्यात आली. अमिताभ यांच्या प्रतिक्षा आणि जलसा व जनक बंगलेही निर्जंतूकीकरण केले जाणार आहेत. अमिताभ आणि अभिषेक यांचे दुसरे कोरोना अहवाल प़ॉझिटीव्ह आला आहे. नानावटी रुग्णालयाचे क्रिटिकल केयर सर्विसचे संचालक डॉ. अब्दुल एस अन्सारी यांनी माध्यमांशी बोलतांना बच्चन यांची प्रकृती पूर्वी पेक्षा ठीक आहे, असे सांगितले. अभिषेक बच्चन यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांचा ब्रीद - इंटू द शेडो या वेब सीरीजचा डबिंग स्टुडीओ सील करण्यात आला आहे. 


नानावटी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांचे मेडिकल बुलेटीन दिले जाणार नाहीत. अमिताभ बच्चन हे स्वतः ट्विटरद्वारे आपल्या तब्बेतिची माहीत देतील, असे त्यांनी सांगितले आहे. शनिवारी रात्री बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. स्वत: ट्विट करुन ही माहिती त्यांनी दिली. बिग बी यांना त्यांच्या घरानजीक असलेल्या विलेपार्ल्यातील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांना शनिवारी सायंकाळी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


रुग्णालयाच्या प्रवक्त्यांकडून बातमीची पुष्टी करण्यात आली होती. मात्र ते कोणत्या कारणांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत याची कुठलीही माहिती उघड करण्यात आली नव्हती. त्यांच्या प्रकृतीची काळजी करत सर्व चाहत्यांनी त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर केले आहे. ‘कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने मी आता रुग्णालयात दाखल होत असून, कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली आहे. निकालाची वाट पाहत आहोत. गेल्या १० दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी’, असे त्यांनी म्हंटले आहे. 



अमिताभ बच्चन नुकतेच आयुष्मान खुरानासोबत शुजित सिरकर यांच्या विनोदी चित्रपट ‘गुलाबो सीताबो’मध्ये दिसले होते. हा चित्रपट सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना व्हायरस पसरल्यामुळे त्याचा प्रीमियर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर झाला. ‘कौन बनेगा करोडपती’च्या बाराव्या पर्वातून ‘बिग बी’ छोट्या परतणार होते. या वर्षाच्या मेमध्ये या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सची सांगता झाली होती. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांमध्ये चेहरे, ब्रह्मास्त्र आणि झुंड यांचा समावेश आहे.



@@AUTHORINFO_V1@@