'माझी प्रकृती ठणठणीत ': राज्यपाल

12 Jul 2020 18:04:24

rajyapal_1  H x



मुंबई :
मुंबईत वाळकेश्वर स्थित राजभवन येथे काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आले होते. ही संख्या आता  २४ झाली आहे.मात्र यादरम्यान आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत आलेली वृत्त निराधार असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहे. राज्यपालांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आली आहे.



‘आपली प्रकृती ठणठणीत असून, आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून, त्यांचे परिणामदेखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणेदेखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मास्कचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.






कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्याना राजभवन येथील कर्मचारी निवासस्थानी अलगीकरण सोयीस्कर असल्यास त्यांना तेथेच त्यांच्या व्यवस्थेनुसार अलगीकरण करण्यात येणार आहे. मात्र राजभवन येथील प्रशासनाने जर महानगरपालिकेकडे अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या, तर तेथील कर्मचाऱ्यांचे अलगीकरण महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या केंद्रांमध्ये त्वरित केले जाणार आहे. महापालिकेच्या 'डी विभाग' कार्यालयाकडून राजभवन येथे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही वेळोवेळी केली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत. राजभवन येथे डॉक्टर्स व तत्सम कर्मचारी आहेत. तथापि आवश्यक वाटल्यास महापालिकेचे डॉक्टर्स व इतर कर्मचारीही मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.राजभवन येथे डॉक्टर्स व तत्सम कर्मचारी आहेत. तथापि आवश्यक वाटल्यास महापालिकेचे डॉक्टर्स व इतर कर्मचारी ही मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.


Powered By Sangraha 9.0