'विंग्स ऑफ गोल्ड' मिळविणारी पहिली कृष्णवर्णीय महिला

12 Jul 2020 16:05:37

wings of gold_1 &nbs
किंग्सविले (अमेरिका) : अमेरिकन नौदलाने प्रथमच नौदलात रुजू झालेल्या कृष्णवर्णीय महिलेचे स्वागत केले. अमेरिकेच्या नौदलाने शुक्रवारी ट्विट केले की, "हा एक ऐतिहासिक क्षण आहे ! लेफ्टनंट जेजी मेडलिन स्विगल यांनी नौदलातील प्रशिक्षण पूर्ण केले असून त्यांना या महिन्याच्या शेवटी फ्लाइट ऑफिसरचा बॅज मिळेल ज्याला 'विंग्स ऑफ गोल्ड' म्हणून ओळखले जाते."



नौदल एअर ट्रेनिंग कमांडने ट्विट केले आहे की," स्विगल ही नौदलातील पहिली कृष्णवर्णीय महिला महिला टॅंकएअर पायलट आहे. 'स्टार्स अँड स्ट्रिप्स' या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, स्विगेल ही बुर्के व्हर्जिनिया येथील असून त्यांनी २०१७ मध्ये यूएस नेव्हल अकॅडमीमधून पदवी प्राप्त केली. टेक्सासच्या किंग्सविल येथील 'रेडहॉक्स ऑफ ट्रेनिंग स्क्वॉड्रन २१' मध्ये त्यांना नेमण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रिपोर्ट्सनुसार, स्विगलच्या या कामगिरीच्या ४५ वर्षांपूर्वी १९७४मध्ये रोझमेरी मारिनर लढाऊ विमान उडविणारी पहिली महिला ठरली.
Powered By Sangraha 9.0