बोरीवलीत शॉपिंग सेंटरला भीषण आग!

    दिनांक  11-Jul-2020 10:06:47
|
fire_1  H x W:


अग्निशमनदलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल!


मुंबई : बोरीवली पश्चिम येथील शॉपिंग सेंटरमध्ये आज पहाटे ३ च्या सुमारास भीषण आग लागली. इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरमध्ये ही आग लागली असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही लेवल-४ आग असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आगीत नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.


इमारतीच्या ग्राउंड प्लोअरवर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून ही आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली. त्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरत आहेत. स्थानिकांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर सकाळी ६ वाजता १४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम अद्याप सुरु आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.