‘बिग बीं’ना कोरोनाची लागण!

    दिनांक  11-Jul-2020 23:03:52
|

Amitabh_1  H x


अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल!


मुंबई :  बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. बिग बी यांना त्यांच्या घरानजीक असलेल्या विलेपार्ल्यातील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.अमिताभ बच्चन यांना शनिवारी सायंकाळी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांकडून बातमीची पुष्टी करण्यात आली होती. मात्र ते कोणत्या कारणांसाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत याची कुठलीही माहिती उघड करण्यात आली नव्हती. त्यांच्या प्रकृतीची काळजी करत सर्व चाहत्यांनी त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करण्यास सुरुवात केली होती.


मात्र आता स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विटरद्वारे आपल्याला कोरोना झाल्याचे जाहीर केले आहे. ‘कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने मी आता रुग्णालयात दाखल होत असून, कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली आहे. निकालाची वाट पाहत आहोत. गेल्या १० दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी’, असे त्यांनी म्हंटले आहे.अमिताभ बच्चन नुकतेच आयुष्मान खुरानासोबत शुजित सिरकर यांच्या विनोदी चित्रपट ‘गुलाबो सीताबो’मध्ये दिसले होते. हा चित्रपट सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना व्हायरस पसरल्यामुळे त्याचा प्रीमियर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर झाला.


‘कौन बनेगा करोडपती’च्या बाराव्या पर्वातून ‘बिग बी’ छोट्या परतणार होते. या वर्षाच्या मेमध्ये या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सची सांगता झाली होती. अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटांमध्ये चेहरे, ब्रह्मास्त्र आणि झुंड यांचा समावेश आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.