गाड्या घेण्यासाठी निधी पण तलाठ्यांना पगार नाही !

    दिनांक  10-Jul-2020 13:39:41
|
UT_1  H x W: 0रत्नागिरी : शिक्षण विभागातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना वाहन खरेदीसाठी परवानगी देणारे सरकार राज्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र, विसरले आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनानंतर आता राज्य सरकारतर्फे तलाठ्यांचेही वेतन रोखण्यात आले आहे. कोरोनासारखी आपत्ती असो किंवा नैसर्गिक आपत्ती असो, ग्रामीण भागात महत्वाची भूमिका बजावणार्‍या तलाठ्यांना गेल्या दोन महिन्याचा पगार मिळाला नसल्याचे कळत आहे. निधीअभावी हे पगार होत नसल्याचे कळत आहे. तसेच त्याआधी झालेल्या पगारातही केलेल्या कपातीचा तपशिल मिळालेला नाही. एकीकडे पगाराची ही अवस्था असताना गावातील दस्त व शासकीय येणी त्वरित जमा करण्याचे आदेश या तलाठ्यांना देण्यात आले आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.