गणेशोत्सव मंडळांना हमीपत्र बंधनकारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |
ganpati bappa _1 &nb




मुंबई : गणेशोत्सव मंडळांना यंदा घरबसल्या ऑनलाईनद्वारे परवानगी मिळणार असली आणि त्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नसले तरी उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत त्यांनी हमी पत्र भरून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. आजपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे ऑनलाईन परवानगी अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळावी, यासाठी एक खिडकी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 मंडप उभारण्याकरीता ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्याची प्रक्रिया आजपासून (१० जुलै) सुरु झाली आहे. यावर्षी कोरोना महरीचेमारीचे संकट ओढावले असून यंदा पोलीस, वाहतूक पोलीस व अग्निशमन दलाची परवानगीची अट शिथिल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडळांकडून यंदा कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत त्याना हमीपत्र बंधन कारक करण्यात आले आहे.
हे हमीपत्र ऑनलाईन सिस्टीममधून डाऊनलोड करून संपूर्ण भरल्यानंतर ऑनलाईन सिस्टीममध्ये अपलोड करावयाचे आहे.
१) गणेशमूर्ती ४ फुटांपेक्षा उंच असणार नाही.
२) गर्दी होऊ नये यासाठी मंडपाचे आकारमान कमीतकमी असेल.
३) सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.
४) कार्यकर्ते पाचपेक्षा अधिक नसतील आणि त्यांना मास्क बंधनकारक असेल.
५) मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येईल. तसेच कार्यकर्ते व इतरांना सॅनिटायझर उपलब्ध असेल.
६) भाविकांना दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल.
७) प्रसाद वाटणे, मूर्तीला हार चढवणे, फुले वाहणे यांना प्रतिबंध असेल.
८) मंडप परिसरात कोणत्याही प्रकारचे स्टॉल नसतील.
९) आरतीच्या वेळी सोशल डिस्टन्स पाळत जास्तीत जास्त १० कार्यकर्ते असतील.
१०) रोषणाई, देखाव्यांना मुरड,
११) आरोग्याभिमुख कार्यक्रम राबविणे,
१२) ध्नविप्रदूषणामुळे कोरोनाबाधितांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता, आणि
१३) गणेशमूर्तीचे विसर्जन मंडपालगतच्या कृत्रिम तलावात करावे अशाप्रकारच्या अटी लादण्यात आल्या आहेत. सध्याच्या कोरोनाच्या संसर्गाचा काळ लक्षात घेता या अटी प्रत्येक मंडळाने पाळणे बंधनकारक आहे.


मुंबई महापालिका क्षेत्रात १२ हजारांहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. ज्या गणेश मंडळांनी गेल्या वर्षी परवानगीसाठी अर्ज केले होते, त्या मंडळांना गेल्या वर्षीच्या परवानगीच्या आधारावर परवानगी देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी मागील वर्षीचा परवानगीचा क्रमांक अर्जात समाविष्ट करणे गरजेचे आहे. तसेच हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. परवानगी प्रक्रिया मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून ऑनलाईन करण्यात आली आहे. महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतीम मुदत येत्या १९ ऑगस्टपर्यंत संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे. मंडळांना अडचणी आल्यास त्यांनी संबंधित सहायक आयुक्तांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा व्हावा यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती सुरुवातीपासूनच आग्रही होती. तशी स्पष्ट भूमिका दीड महिन्यापासूनच जाहीर केली होती. समितीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने साधेपणाने उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकार आणि पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मंडळांनी पालिकेने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत त्यांना सहकार्य करावयाचे आहे.


--नरेश दहिबावकर, अध्यक्ष- सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
@@AUTHORINFO_V1@@