मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग दरड कोसळल्यामुळे ठप्प!

10 Jul 2020 10:35:33

kashedi ghat_1  



मुसळधार पावसामुळे कशेडी घाटात कोसळली दरड


मुंबई : कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रभर हा महामार्ग ठप्प होता. पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत ही दरड कोसळली. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि एल अँड टीची टीम घटनास्थळी दाखल झाली.


दरम्यान, रात्रभर रस्त्यावरील दरड उपसण्याचे काम सुरू होते. परिणामी आज कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतुक बंद झाली आहे. सध्या महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरु आहे. दरड उपसण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल.


गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रत्नागिरी, मुंबई तसेच गोव्यामध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी विन्हेरे नातू मार्गावर दरड कोसळली होती. त्यामुळे महाड कडून खेडकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद झाला होता.




Powered By Sangraha 9.0