गँगस्टर विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |
vikas dubey_1  


आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून केले होते पलायन 


उत्तर प्रदेश : कानपूरच्या बिकरू गावात सीओसह आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे शुक्रवारी सकाळी चकमकीत ठार झाला. यूपी एसटीएफची टीम त्याला उज्जैनहून कानपूर येथे ट्रान्झिट रिमांडवर घेऊन जात होती. परंतु कानपूरपासून १७ किमी दूर सकाळी ६.३० वाजता ताफ्यातील एक गाडी पलटली.


विकास त्याच गाडीत बसला होता. अपघातानंतर विकासने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याच्या छातीत आणि कमरेत गोळी लागली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे सकाळी ७.५५ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. कानपूर रेंजच्या आयजीने विकासच्या मृत्यूची पुष्टी केली. विकास दुबेला गुरुवारी उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती.


गुरुवारी उज्जैनमध्ये कानपुर एनकाऊंटरमधील मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक केल्यानंतर स्पेशल टास्क फोर्सच्या टीमवर त्याला परत आणण्याची जबाबदारी सोपवली होती. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता उज्जैनमधील महाकाल मंदिरामध्ये विकास दुबे याला अटक करण्यात आली होती. कानपूर मधील ८ पोलिसांची हत्या केल्यानंतर गँगस्टर हा दोन दिवस नोएडामध्ये लपून बसला होता.




@@AUTHORINFO_V1@@