नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jul-2020
Total Views |

Nepal_1  H x W:


दूरदर्शन वगळता इतर वाहिन्या झाल्या दिसेनाश्या!

काठमांडू : नेपाळ आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांनंतर नेपाळच्या सरकारने भारतीय न्यूज चॅनलवर बंदी घातली आहे. दूरदर्शन वगळता अन्य सर्व वाहीन्या पाहण्यासाठी नेपाळने बंदी घातली आहे. भारतीय न्यूज चॅनलवरून नेपाळ सरकार आणि पंतप्रधानांची बदनामी व गैरप्रचार करत असल्याचा नेपाळ सरकारने आरोप केला आहे. अशी माहिती नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सने दिली  एका वृत्तसंस्थेला दिली आहे.


नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनलचे सिग्नल बंद करण्यात आले असल्याची माहिती नेपाळी केबल प्रोव्हायडर्सने दिली. मात्र, असे असले तरी आतापर्यंत नेपाळ सरकारकडून अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही.


नेपाळमधील माध्यमांनुसार “नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्याविरोधात भारतीय माध्यमे विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत. आता हे अती झाले आहे. भारतीय माध्यमांनी आपली बडबड बंद करावी.” असे सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ म्हणाले.


तसेच नेपाळ सरकारने भारतातल्या काही वृत्त वाहिन्यांविरोधात 'राजकीय आणि कायदेशीर' कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नेपाळ सरकारच्या म्हणण्यानुसार 'बनावट आणि निराधार' वृत्त या वाहिन्या प्रसारित करत आहेत. गेल्या काही दिवसांत नेपाळमधल्या चिनी राजदूत हाऊ यांकी नेपाळी कम्युनिस्ट पक्ष या सत्ताधारी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. या भेटींसंदर्भात भारतीय वृत्तवाहिन्या करत असलेल्या वार्तांकनावरून नेपाळमध्ये संताप व्यक्त होतोय. भारतीय वृत्तवाहिन्या आपल्या वार्तांकनात या भेटींची थट्टा करत असल्याचे नेपाळ सरकारचे म्हणणे आहे.







@@AUTHORINFO_V1@@