दहशतवाद्यांनी आजोबांना केले ठार : गोळीबारातही नातू शेजारी बसून

    दिनांक  01-Jul-2020 14:18:02
|
terrerist attack in jk gr

जम्मू : काश्मीरातील बारमुला जिल्ह्यात सोपेर येथे एक हृदयद्रावक घटना घडली. सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या भागात हल्ला चढवला होता. या दरम्यान, गोळीबारात एका वृद्धाचा मृत्यू झाला. मात्र, त्यांचा तीन वर्षांचा नातू आपल्या आजोबांना रक्ताच्या थारोळ्यात टाकून पळाला नाही.terrerist attack in jk gr


धीटपणे तो तिथेच बसून राहीला, काहीकाळ त्याने आपल्या आजोबांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयश आल्यानंतर आजोबांच्या मृतदेहावर तसाच बसून राहिला. गोळीबाराच्या आवाजात न डगमगता तिथेच बसून राहिला. जवानांनी त्याची तिथून सुटका केली.


terrerist attack in jk gr 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.