भारत चीन तणाव : चीनने नियंत्रण रेषेवर केले २० हजार सैनिक तैनात

01 Jul 2020 16:48:58

ind china_1  H  
 
 
 
 
नवी दिल्ली : भारत चीन सीमेवरील तणाव निवळण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. नुकतेच चीनने पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर आणखी २० हजार सैनिक तैनात केले आहेत. त्यामुळे सीमेवर चिनी आणि भारतीय सैन एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. नियंत्रण रेषेवरील वाद निवळण्यासाठी चर्चा सुरु असतानाच चीनकडून अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे.
 
 
भारतीय सैनिक झिंजियांग प्रांतातील आणखी १० ते १२ हजार सैन्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. चीनने या भागात अत्याधुनिक लष्करी वाहने आणि शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. त्यामुळे चिनी सैनिक भारतीय सीमेवर २ दिवसांच्या आत पोहचू शकतात, अशा पद्धतीने थांबले आहेत.पूर्व लडाखमधील सीमारेषेवर चीनने दोन डिव्हिजन म्हणजेच सुमारे २० हजार सैनिक तैनात केले आहे. आणखी दहा ते बारा हजार सैनिक चीनने सीमारेषेपासून १ हजार किलोमीटर लांब ठेवले आहे.
 
 
मात्र, हे सैनिक जलद सीमेवर पोहचण्याची क्षमता ठेवून आहे. सपाट भूप्रदेश असल्याने चीनी सैनिक जलद हालचाल करु शकते, असे लष्करातील सुत्रांनी सांगितले. १५ जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या सैनिकांच्या मारहाणीनंतर दोन्ही देशातली वातावरण पेटले आहे. भारतानेही सीमेवर अतिरिक्त सैन्य जमा केले आहे. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
Powered By Sangraha 9.0