सरकारी बंगला महिन्याभरात रिकामा करण्याचे प्रियांकांना आदेश

01 Jul 2020 20:22:27
priyanka_1  H x





नवी दिल्ली : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांना त्यांचा दिल्लीतील लोधी इस्टेट परिसरातील सरकारी बंगला १ ऑगस्ट, २०२० पर्यंत रिकामा करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आदळआपट करण्याची शक्यता आहे.


काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी – वाड्रा यांनी केंद्र सरकारतर्फे दिल्लीतील लोधी इस्टेट या परिसकामध्ये सरकारी निवासस्थान देण्यात आले आहे. मात्र, आता सदर बंगला महिन्याभरात म्हणजे १ ऑगस्ट, २०२० पर्यंत रिकामा करण्याची नोटीस त्यांना बजाविण्यात आली आहे. तसे न केल्यास त्यानंतरच्या कालावधीसाठी भाडे अथवा दंड भरावा लागेल, असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.


प्रियांका गांधी – वाड्रा यांना आता एसपीजी सुरक्षा नसल्याने त्यांना सरकारी निवासस्थान रिकामे करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना सध्या झेड प्लस प्रकारची सुरक्षा आहे आणि त्याअंतर्गत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. त्यामुळे महिन्याभरात प्रियांकांना बंगला सोडावा लागणार आहे.


दरम्यान, केंद्र सरकारने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांची एसपीजी सुरक्षा काढून झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय़ घेतला होता.


Powered By Sangraha 9.0