‘कोरोना’ रुग्णांचा आलेख चढताच...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2020
Total Views |

india corona pandemic_1&n



केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी देशात ९ हजार, ९८७ रुग्ण सापडले आणि ३३१ जणांचा मृत्यू झाला. चिंताजनक बाब म्हणजे देश ‘अनलॉक’ होत असताना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत देशातील रुग्णसंख्या २ लाख ६६ हजार ५९८ इतकी होती.



जगभरातील कोरोना संक्रमितांची संख्या ७२ लाखांच्या पुढे गेली असून भारतातही सातत्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांपासून देशात दररोज नऊ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी देशात ९ हजार, ९८७ रुग्ण सापडले आणि ३३१ जणांचा मृत्यू झाला. चिंताजनक बाब म्हणजे, देश ‘अनलॉक’ होत असताना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपर्यंत देशातील रुग्णसंख्या २ लाख, ६६ हजार, ५९८ इतकी होती. त्यापैकी १ लाख २९ हजार २१५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले तर १ लाख, २९ हजार, ९१७ रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ७ हजार, ४६६ इतकी झाली. देशात कोरोनाप्रसार कसा झाला, याचा विचार केल्यास चार महिने, एक आठवडा आणि तीन दिवसांपूर्वी म्हणजे ३० जानेवारीला चीनमधून केरळमध्ये आलेली व्यक्ती कोरोनासंक्रमित असल्याचे आढळले. हा देशातील पहिलाच रुग्ण होता आणि त्यानंतर भारतातून अन्य देशांत गेलेले भारतीय विमानमार्गे देशात येत राहिले. त्यांच्या माध्यमातून देशात पहिल्या टप्प्यांत कोरोनाचा फैलाव होऊ लागला. ३० जानेवारी ते ३१ मार्च हा दोन महिन्यांचा कालावधी पाहिला असता देशात केवळ एक हजार ३९७ कोरोनाग्रस्त होते, तर ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. म्हणजे या काळात फार मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला नाही किंवा होऊ दिला नाही. तसेच मृतांची संख्याही किमान (सुदैवाने मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अजूनही किमानच आहे) होती. केंद्र सरकारने केलेले प्रयत्न, पुकारण्यात आलेला ‘लॉकडाऊन’ त्याची व्यवस्थित करण्यात येत असलेली अंमलबजावणी आणि संशयितांचे स्वतःहून पुढे येणे, यामुळे संक्रमण नियंत्रणात होते. नंतर मात्र कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होऊ लागली आणि या दुसर्‍या टप्प्यातील रुग्णवाढीला कारण ठरला तो ‘तबलिगी’ जमातीचा दिल्लीच्या मरकज भवनमध्ये झालेला कार्यक्रम.




मार्चच्या अखेरच्या आठवड्यात मुस्लीम धर्मीयांतील ‘तबलिगी’ जमातीच्या कार्यक्रमाचे बिंग फुटले आणि त्यात परदेशातून आलेल्या कोरोनाबाधित मुल्ला-मौलवी-इमामांनी भाग घेतल्याचे उघड झाले. कार्यक्रमानंतर ही सगळी मंडळी देशाच्या विविध राज्यांतही धर्मप्रचारार्थ बाहेर पडली. पण, धर्माच्या प्रचाराऐवजी त्यांनी कोरोनाप्रसाराला चांगलाच हातभार लावला. आपल्याला कोरोना असल्याचे लपवून ते जिथे जिथे गेले, त्या त्या गल्ली-मोहल्ल्यांत कोरोना रुग्ण आढळू लागले. प्रशासकीय यंत्रणेने त्यातल्या कोरोनाबाधितांना आणि संशयितांना स्वतःहून समोर येण्याचे आवाहन केले होते, तसेच जे समोर येणार नाहीत, ते ज्या परिसरात दडून बसले, तिथे शोधमोहिमही राबवली. त्यासाठी आरोग्य कर्मचारी व पोलिसांची पथकेही पाठवण्यात आली. पण, ‘तबलिगी’ जमातीच्या सदस्यांनी व त्यांच्या धर्मांध समाजबांधवांनी डॉक्टर, परिचारिका, पोलिसांवर हल्ल्याचे उद्योग केले. ज्यांना ‘क्वारंटाईन सेंटर’ किंवा रुग्णालयांत दाखल केले त्यांनी तिथल्या कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक केली, महिलांशी दुर्व्यवहार केला. ‘तबलिगीं’कडून अशी कृत्ये होत असतानाच काही मुस्लीम धर्मगुरुंनी ‘कुराण से कोरोना’ म्हणत आम्हाला काही धोका नसल्याचे म्हटले, तर काहींनी कबुतराचा कुठलातरी अवयव खाल्ला की कोरोना होणार नाही, असे सांगितले. अशा अंधश्रद्धा पसरवण्याच्या प्रकारामुळे मुस्लीम समाजात कोरोनाविषयी जनजागृती झाली नाही व ते ‘तबलिगीं’ना आश्रय देऊ लागले. मात्र, या सगळ्याचा दुष्परिणाम देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यात झाला. १  एप्रिल ते ३० एप्रिल या एका महिन्यातच रुग्णसंख्या थेट ३३ हजार, ६१० वर पोहोचली. उल्लेखनीय म्हणजे, आरोग्य मंत्रालयाने याच काळात देशातील कोरोनाग्रस्तांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक ‘तबलिगी’ जमातीचे सदस्य असल्याचे सांगितले होते. म्हणजेच कोरोनाचा प्रसार करण्यात ‘तबलिगी’ जमातवाले आघाडीवर होते.




कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. पण, एक ‘तबलिगी’ जमातवाला किती जणांच्या संपर्कात आला याची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, या ३० टक्के कोरोनाग्रस्त ‘तबलिगीं’नी रुग्णालयात दाखल होईपर्यंत इतरांजवळ हा विषाणू वाहून नेण्याचे काम नक्कीच केले. त्यामुळे १ मेपासून रुग्णसंख्येत इतकी वाढ होत गेली की ती आता अडीच लाखांच्याही पुढे गेली. तथापि, यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असल्याचे लक्षात येते आणि रुग्णसंख्येतील वाढ ही महाराष्ट्रातच अधिक होत असल्याचे समजते. हा रुग्णवाढीचा तिसरा टप्पा आणि त्याला दुसर्‍या टप्प्यातील ‘तबलिगी’ जमातवाल्यांची पार्श्वभूमी होतीच. उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश वगैरे राज्यांत ‘तबलिगीं’च्या कोरोनाप्रसाराला रोखण्यासाठी तिथली सरकारे कठोर कारवाई करत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांना स्वतःहून पुढे येण्याची प्रार्थना करत होते. खरेतर इथे कोम्बिंग ऑपरेशनसारखी धडक कारवाई करायला हवी होती, पण त्यांनी तसा काही निर्णय घेतला नाही. त्यातून कोरोना रुग्ण वाढतच राहिले आणि आज तर अशी परिस्थिती आहे की, देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांनी-ठाकरे सरकारने चीनपेक्षाही अधिक रुग्ण महाराष्ट्रात ‘करुन दाखवले.’ राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल ८८ हजार, ५२८ इतकी झाली असून मृतांची संख्या तीन हजारांच्यापुढे आहे. (दुसर्‍या क्रमांकावरील तामिळनाडूत हीच संख्या ३३ हजार, २२९ म्हणजे ५५ हजार, २९९ ने कमी आहे.) राज्य सरकारची आरोग्य क्षेत्रातील तयारी इतकी जोरदार आहे की, ही संख्या लवकरच एक लाखांचाही टप्पा ओलांडेल! त्यातल्या त्यात मुंबईत तर कोरोनाने हाहाकार माजवल्याचे दिसते. इथली रुग्णसंख्या ५० हजारांच्या उबंरठ्यावर आहे. चाचण्यांची अपुरी संख्या, रुग्णांना रुग्णालये, रुग्णशय्या आणि रुग्णवाहिकांची वानवा, त्यामुळे जनतेच्या नशिबी आलेले भोग, तडफडून येणारे मृत्यू, असे चित्र सध्या मुंबईत दिसते. तरीही सत्ताधारी ढिम्मच, आपली जनता अशी कोरोनाने बाधित होत असल्याचे पाहून त्यांच्या निगरगट्टपणाला जराही पाझर फुटताना दिसत नाही. केंद्र सरकारने ही संख्या पाहून नुकतीच महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांत घरोघरी सर्वेक्षणाची घोषणा केली. म्हणजे आपल्या राज्य सरकारने स्वतः ही जबाबदारी घेतली नाही, तर त्यासाठीही केंद्रालाच पुढे यावे लागले. आता राज्य सरकारने निदान त्यात तरी सहकार्य करावे, म्हणजे इथल्या जनतेला दोन क्षण व्यवस्थित जगता येईल, इतकेच.


@@AUTHORINFO_V1@@