देश झाला कोरोनामुक्त, पंतप्रधानांनी केला डान्स !

08 Jun 2020 19:36:02
PM _1  H x W: 0
 
 
 
वेलिंग्टन : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना काही देशांनी त्यावर सक्षमपणे मात केली आहे. न्यूझीलंडनेही कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बातमी आहे. सोमवारपासून न्यूझीलंडने कोरोनाच्या बचावासाठी देशभरात लावलेले सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेला शेवटचा रुग्ण बरा झाला आहे. त्यानंतर सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. न्यूझीलंड कोरोना मुक्त झाल्यानंतर देशाच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी आनंदाने काहीकाळ घरात डान्स केल्याची प्रतिक्रीया दिला आहे. त्यांच्या नेतृत्वात कोरोनावर मात करण्यास यश मिळाल्याबद्दल जगभरातून त्यांचे कौतूक होत आहे. 

न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही, विदेशी वृत्तसंस्थेनुसार, न्यूझीलंड या देशाच्या आरोग्य मंत्रालयातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली. “ आमच्याकडील शेवटचा रुग्ण बरा झाला आणि आम्ही आता कोरोनामुक्त झालो आहोत हे कळल्यानंतर मी आनंदाने आमच्या घरातच थोड्या वेळासाठी डान्स केला”, असे पंतप्रधान आर्डेन म्हणाल्या. कोरोना हद्दपार झाल्याचा आम्हाला विश्वास आहे. देशांतर्गत असलेले निर्बंध हटवण्यात आले असले तरी देशाच्या सीमा या काही काळासाठी बंदच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले कि, "न्यूझीलंडमध्ये १७ दिवसांपूर्वी शेवटचा कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यन्त १५०० च्या आसपास लोकांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी फक्त २२ जणांचाच मृत्यू झाला. भारतात तर सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या हि अडीच लाखांच्या वर गेली आहे.



Powered By Sangraha 9.0