"भाजप कार्यकर्त्यांनो खचून न जाता जोमाने कामाला लागा!"

    दिनांक  08-Jun-2020 20:47:54
|
BJP _1  H x W:


सांगली : समर्पित व निरपेक्ष भावनेने काम करणारा आपला कार्यकर्ता आहे. पक्षाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण पक्षाला काय दिले याचा विचार करणे गरजेचे आहे.विधानसभा निवडणूक ही कार्यकर्तांच्या आस्तित्वासाठी व स्वाभिमानासाठी लढवली होती.या निवडणुकीतील जनमत हे तुम्हाला व मला बळ देणारे आहे.कोणी कोणाला किती स्विकारले याची चर्चा न करता यापुढे ही राष्ट्रवादी विचाराचे विरोधक एकत्रीत येऊन निवडणुका लढतील.भाजप पक्ष हा कर्तबगार कार्यकर्ताला बळ देणारा आहे यामुळे आपण खचुन न जाता अधिक जोमाने काम करायचे असुन यापुढे मतदार संघातील प्रत्येक निवडणुक भाजप पक्षाचा कार्यकर्ता लढवेल, असा विश्वास उरूण-इस्लामपुर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील (दादा) यांनी व्यक्त केला.
 
नरेंद्र मोदी सरकार पर्व-२ अभियान कार्यक्रमाच्या इस्लामपुर विधानसभा व सांगली जिल्ह्याच्या संयोजक पदी निवड झाल्याबद्दल उरूण-इस्लामपुर भाजपा शहरच्या वतीने आयोजीत केलेल्या सत्कार समारंभात ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी आ.भगवानराव सांळुखे (आप्पा) हे होते.यावेळी संजय हवलदार यांची या अभियानाच्या सांगली जिल्हा पंतप्रधान पत्र वितरण प्रमुख म्हणुन निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष व भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील (दादा) म्हणाले, इस्लामपुर विधानसभा मतदार संघात भाजपा पक्षाचा विचार घराघरात पोहचविण्याचे काम व बुथनुसार कार्यकर्तांचे संघटन करण्याचे काम माझ्या प्रत्येक कार्यकर्ताने केले ,पक्षवाढीसाठी विविध उपक्रम पक्षाच्या आदेशानुसार राबविले गेले.
 
अनेक ठिकाणी पक्षवाढीसाठी असेल ,कार्यकर्ताच्या न्याय हक्कासाठी असेल यासाठी विरोधकांशी टोकाचा संघर्ष केला.कार्यकर्ता हिच आपली ओळख व ताकद असुन त्याला बळ देणे हे नेतृत्वाचे कर्तव्य आहे .माझ्यासह अनेक कार्यकर्तांना पक्षवाढीसाठी संघर्ष करावा लागत आहे.जेवढा मोठा आपला संघर्ष असेल तेवढा मोठा आपल्या विजयाचा उंच पतका असेल व त्याचा आनंद ही तेवढ्याच उंचीचा असेल.पक्षाने विधानसभा निवडणूकीत दुर्लक्ष केल्याची आपल्या कार्यकर्तांची भावना झाली, नाराजी पसरली पण आपल्या संघटनेला मरगळ आली नाही भाजप पक्षाने आता आपल्यावर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.ती यशस्वीपणे तर पार पाडायची आहे.आपण कुणी ही खचुन जावु नका पक्षाने आपल्याला जिल्हापातळीवरील संधी देवुन सन्मान केला आहे.सांगली जिल्ह्यासह इस्लामपुर विधानसभा मतदार संघात भाजपाचे,सन्मानीय नरेंद्रजी मोदी,देवेंद्रजी फडणवीस,चंद्रकांत पाटील (दादा) यांचे विचार पोहविण्यासाठी अविरतपणे काम सुरु ठेवावे.
 
अध्यक्षस्थानावरुन बोलताना माजी आ.भगवानराव सांळुखे (आप्पा) म्हणाले निशिकांत दादासारखे कर्तबगार,स्वच्छ प्रतिमेचा ,उच्चविचाराचा एक जनसेवक भाजपा पक्षाला व आपल्या मतदार संघाला मिळाला आहे, इस्लामपुर मतदार संघातील भाजपा पक्षाच्या विचाराचे चित्र खर्‍या अर्थाने रेखाटण्याचे काम व ते अधिक सुंदर करण्याचे काम दादांच्या नेतृत्वाने केले आहे हे प्रत्येकाने मान्य करायला हवे,कारण या मतदार संघातील तीन वर्षापुर्वीचा भाजप आणि आताचे फुललेले कमळ यांचे सर्व श्रेय दादांना व त्यांनी जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्ताला जाते.दादांना राजकीय भविष्य चांगले असुन भाजप पक्ष त्यांचा योग्य वेळी नक्की सन्मान करेल.स्वकीयांनी ही मी जुना हा नविन हा विचार बाजुला सारुन सक्षम व कर्तबगार नेतृत्वाच्या पाठीशी थांबुन पक्षहीताचा विचार केला पाहीजे.व्देषाचे व अविचाराचे राजकारण बाजुला ठेवावे जेणे करुन स्वत:चे ,दुसर्‍याचे व पक्षाचे राजकीय नुकसान होणार नाही.
 
 
विरोधकाची कपटनिती,व्देषनिती,अर्थनिती मोडुन काढू 
 

माजी नगराध्यक्ष व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉॉल असोशिएशनचे माजी अध्यक्ष सुधीर पिसे म्हणाले,निशिकांतदादाच्या कर्तृत्वावर,नेतृत्वावर आमचा विश्वास आहे म्हणून त्यांचे नेतृत्व मानुन आम्ही भाजपा पक्षात प्रवेश केला.दादांना विरोधकांशी मोठा संघर्ष करावा लागत आहे पण ते कधीच संघर्षाला घाबरले नाहीत कारण घेतलेल्या निर्णयाशी ते कधी तडजोड करत नाहीत,आपल्या मतदार संघात आज पर्यत विरोधकांनी कपटनिती,व्देषाचे व अर्थनितीचे राजकारण केले त्यामुळे या मतदार संघात विरोधकांची मोळी कधी बांधली गेली नाही. 
नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मतदाराला निशिकांतदादांची उमेदवारी अपेक्षीत होती मात्र वरीष्ठ पातळीवर मुंबईत बसुन विरोधीबाबा फासे असे टाकत होते जेणेकरुन माझे विरोधक कसे प्रवाह बदलतील आणि माझा मार्ग मोकळा होईल त्यात ते यशस्वी झाले त्यामुळेच हा विजय झाला नाहीतर या मतदार संघाचा विजयाच्या गुलालात भाजपाचा कार्यकर्ता रंगला असता.यासाठी भाजप पक्षातील सर्वानी मतभेद बाजुला ठेवुन दादांसारख्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा रहावे.दादा हे राजकीय नेते नसुन निस्वार्थीपणे जनसेवक म्हणुन काम करणारा कार्यकर्ता आहे.यासाठी भाजपाच्या वरीष्ठपातळीवर विचार होणे आवश्यक आहे तरच विरोधकांची कपटनिती,व्देषाचे राजकारण व अर्थनिती मोडीत निघेल असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील,राजेश मंत्री,भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत,चंद्रशेखर तांदळे,फिरोज पटेल यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
 
भाजपाचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील,जेष्ठ नेते मधुकर हुबाले,उमेश रायगांधी,नगरसेविका मंगल शिंगण,चेतन शिंदे,यदुराज थोरात,गजानन फल्ले,सत्यवान रास्कर,बाळासाहेब कोरे,विश्वास सांळुखे,भास्कर मोरे,आदिनाथ चौधरी,अजित पाटील,अक्षय कोळेकर,सतेज पाटील,धनराज पाटील,अमित कदम,विकास पाटील,प्रविण परीट,तानाजी पाटील,धनाजी पाटील,पांडुरंग खैरे,रविंद्र पिसाळ,आण्णा कुंडले आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन विक्रम शिंदे यांनी केले,स्वागत व प्रास्थाविक भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत यांनी केले.आभार नगरसेविका कोमलताई बनसोडे यांनी मानले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.