देवेगौडांची पुन्हा राजकारणात एन्ट्री ! राज्यसभेसाठी सोनियांचा आग्रह ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jun-2020
Total Views |
HD devegaoda _1 &nbs





बंगळुरू : माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलर पक्षाचे सर्वेसर्वा एचडी. देवेगौडा हे वयाच्या ८७ व्या वर्षी ते पुन्हा एकदा देशाच्या राजकारणात सक्रीय होणार आहेत. पक्षातील आमदार, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व अन्य नेत्यांच्या आग्रहामुळे आगामी राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत. अर्थात दिल्लीहून आग्रह झाल्याने राज्यसभेत पोहचण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. सोनिया गांधींनी त्यांना सक्रीय राजकारणात पुन्हा पदार्पणासाठी शुभेच्छाही दिल्या.


 
मंगळवारी एचडी देवेगौडा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी ही माहिती दिली. कर्नाटकात राज्यसभेच्या ४ जागा आहेत. १९ जून रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ९ जून असणार आहे. जेडीएसचे सद्याचे खासदार कुपेंद्र रेड्डी हे देवेगौडा यांच्यासाठी आपली जागा सोडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनिया गांधींनीच देवेगौडा यांना शुभेच्छा दिल्याने कर्नाटक राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच देवेगौडा यांना पाठिंबा देणार असल्याच्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.



 
दरम्यान, काँग्रेस कर्नाटहून आपल्या एका उमेदवाराला सहज राज्यसभेत पाठवू शकते. यासाठी पूर्वीच काँग्रेसचे दिग्गज नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. खर्गे यांना पाठिंब्यासाठी आवश्यक असलेल्या आमदारांशिवाय अतिरिक्त १४ आमदारांची मत राहणार आहेत. या आमदारांच्या मतांचा वापर काँग्रेस देवेगौडा यांच्यासाठी करू शकते.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@